Posts

Showing posts from June, 2017

राजर्षि शाहू महाराज

Image
जीवन राजर्षी शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म  जून २६ ,  इ.स. १८७४  रोजी  कागल  येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च,  इ.स. १८८४  रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.  एप्रिल २ ,  इ.स. १८९४  रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे  मे ६ ,  इ.स. १९२२  रोजी त्यांचे निधन झाले. जन्मदिवस शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात. कार्य शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९